| माणगाव | प्रतिनिधी |
रातवड येथील माध्यमिक विद्यामंदिर विद्यालयाने माणगाव तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन करून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. या स्पर्धा दि. 18 ते 19 सप्टेंबर या कालावधीत माणगाव येथील तालुका क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत रातवड विद्यालयातील मुलींमध्ये धावण्याच्या स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात दिया साटम (400 मी.) प्रथम, 17 वर्षांखालील गटात निधी फराडे (800 मी.) द्वितीय, संस्कृती ऐत (800 मी.) तृतीय, श्रेया बाईत (3000 मी.) द्वितीय, आर्या उंडरे (1500 मी.) तृतीय, क्रॉस कंट्री 4/100 रिले रातवड विद्यालय द्वितीय, अंतरा पवार प्रथम, संस्कृती फराडे द्वितीय यांनी क्रमांक पटाविले आहेत. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांची निवड जिल्हा पातळीवर झाली आहे. हे विद्यार्थी जिल्हा स्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या यशासाठी विद्यालयाचे क्रीडा प्रमुख श्रीकृष्ण गरधे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संतोष कदम यांनी यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक् शिक्षक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.संस्थेचे सरचिटणीस डॉ.निलेश रेवगडे, शालेय समितीचे अध्यक्ष संजय पालकर, पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विध्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.







