तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत वेश्वी, वायशेतचे विद्यार्थी अव्वल
| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली येथे नुकत्याच 5 व 6 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वी आणि माध्यमिक शाळा वायशेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये वयोगट 14 वर्षाखालील मुले लांब उडी स्पर्धेत रामदास सुरेश पवार चतुर्थ क्रमांक, वयोगट 17 वर्षाखालील मुले लांब उडी स्पर्धेत प्रसन्न प्रपेश पवार प्रथम क्रमांक, 3000 मीटर धावणे द्वितीय क्रमांक आणि 100 मीटर अडथळा शर्यत (हर्डल्स) स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला, तर वयोगट 17 वर्षाखालील मुले गोळा फेक स्पर्धेमध्ये साईराज रवींद्र पेडणेकर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला.
पीएनपी माध्यमिक शाळा वायशेतच्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये वयोगट 14 वर्षाखालील मुले थाळीफेक स्पर्धेमध्ये सागर टीम्मा गोटेकर प्रथम क्रमांक, वयोगट 17 वर्षाखालील मुले लांब उडी स्पर्धेत आर्यन सुरेश दौंड चतुर्थ क्रमांक, वयोगट 17 वर्षाखालील मुली महेक नासिर शेख गोळा फेक मध्ये द्वितीय क्रमांक तर थाळी फेक मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धा स्पर्धा खालापूर एच.ओ.सी. रसायनी येथे पार पडणार आहेत.
या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी माध्यमिक शाळा वेश्वीचे मुख्याध्यापक निलेश मगर, माध्यमिक शाळा वायशेतच्या मुख्याध्यापिका वैशाली पाटील, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.