आवरे प्राथमिक शाळेत वकृत्व स्पर्धा

। चिरनेर । वार्ताहर ।

शब्द सम्राट, शब्दाचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रत्नाकर गाताडी यांचा दहावा पुण्यस्मरण सोहळा आवरे येथील प्राथमिक शाळेत साजरा करण्यात आला. यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर विद्यार्थ्यांच्या वकृत्व स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत पूर्वी म्हात्रे-प्रथम, आकांक्षा भगत-द्वितीय व आराधना गावंड-तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, मुंबई विद्यापीठात रसायन शास्त्र विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला रमेश गावंड, प्रभाकर गावंड, दिनेश्‍वर गाताडी, देवेंद्र पाटील, नागेंद्र म्हात्रे, ज्ञानेश्‍वर गावंड, निलेश गावंड, राजेंद्र ठाकूर, सुनील ठाकूर, सुभाष म्हात्रे, परेश गावंड, करण ठाकूर, प्रेम म्हात्रे, सचिन पाटील, निर्भय म्हात्रे, स्नेहल गावंड, राजेश गावंड, प्रमोद म्हात्रे, अलका गावंड, माई म्हात्रे व निवास गावंड उपस्थित होते.

Exit mobile version