| आगरदांडा | प्रतिनिधी |
कोकण उन्नती मित्रमंडळाचे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय, मुरुड जंजिरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून मुरुड नगरपरिषदेच्यावतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा दिला. या स्पर्धेत यजमान वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत बाजी मारली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुभाष म्हात्रे यांनी केले. सदर स्पर्धा दोन वयोगटांत पार पडली. यामध्ये गट 1 (इयत्ता 8 वी ते 10 वी) आणि गट 2 (इयत्ता 11 वी ते पदवी स्तर) अशा दोन विभागांत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले. यामध्ये सुयश गायकर याने प्रथम क्रमांक, अंतरा मसाल तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मान्यवरांनी स्वागत केले. स्पर्धेचे परीक्षण तनुजा गोबरे, प्रीती संधने, अशोक कामणे , डॉ. सीमा नाहीद यांनी केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, पांडुरंग आरेकर, सतेज निमकर, डॉ. श्रीशैल भैरगुंडे, डॉ. सुभाष म्हात्रे, प्रा. प्रणव बागवे, विद्यार्थी आदिंसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवेश पाटील यांनी केले.तर आभारप्रदर्शन डॉ. श्रीशैल भैरगुंडे यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
