मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वक्तृत्व कार्यक्रम

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन येथील सार्वजनिक वाचनालय व कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुक्रवारी (दि.27) ‌‘मला आवडलेली गोष्ट/मला आवडलेले पुस्तक‌’ या वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या गौरवपर वातावरणात झाली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने व ओघवत्या मराठीत आपली मते मांडली. सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांनी ‌‘मला आवडलेली गोष्ट/मला आवडलेले पुस्तक‌’ या विषयावर निरागस शैलीत गोष्टी सांगत व भाषणे करत उपस्थितांची मने जिंकली. मराठी भाषेचे संवर्धन आणि वाचन संस्कृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन व आयोजन केल्याबद्दल कार्यकारी मंडळाचे विशेष अभिनंदन करण्यात आले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Exit mobile version