। रोहा । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावरील मौजे पुगाव येथील हॉटेल नम्रता गार्डनसमोरून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोलाडजवळील पुगावजवळ भरधाव वेगातील मुंबईकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या कारने दुचाकीवरील तिघांना धडक दिली. या अपघातात रामनाथ हिलम, संजय वाघमारे, अजय वाघमारे तिघेही रा. चिवे, ता. जांभूळपाडा जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, तपासा दरम्यान दुचाकीचालकाकडे वाहन परवाना नसल्याचे उघड झाले आहे







