| भंडारा | प्रतिनिधी |
वरठी येथे गुरुवारी (दि.06) सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एका 11 वर्षीय मुलीच्या जागीच मृत्यू झाला. याच आपघातात एक दुचाकी चालक व एक मुलगा जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरठी येथून दुचाकी चालक बालू सेलोकर आपल्या लहान मुलीसह घराजवळच्या मुलाला ट्यूशनवरून घरी एकलारी येथे जात असताना वरठी येथील रेल्वे पुलावर भंडाऱ्याकडे जात असलेल्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की, दुचाकीस्वार एकता बालू सेलोकर (11) राहणार एकलारी या मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक तिचे वडील बालू सेलोकर (45) व विर कन्हैया मारवाडे (12) हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टिप्पर चालकाने पळ काढला. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत गर्दी केली होती. बऱ्याच वेळानंतर पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मार्ग मोकळा केला. अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक वरठी पोलिसांनी ताब्यात घेतला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.