| रसायनी | वार्ताहर |
रेल्वेची ठोकर लागून वयोवृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे सारसई गावच्या हद्दीत मृत्यू झालेल्या इसमाचे नाव साखऱ्या इक्या पवार (62) यांना रेल्वेची ठोकर लागून रेल्वे पटरीवर इलेक्ट्रीक पोलच्या मध्ये जखमी होऊन पडले होते. याबाबत गणपत साखऱ्या पवार, रा. केळवणे, आदिवासी वाडी यांनी रसायनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून, जखमी साखऱ्या पवार याला औषधोपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय चौक येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई माळी व तपासिक अंमलदार पोहवा पवार अधिक तपास करीत आहेत.