महारक्तदान शिबिरात चिपळूणकरांचा उत्स्फूर्त सहभाग

। चिपळूण । प्रतिनिधी ।
ब्लड लाईन ग्रुप आणि वैश्य समाज चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रेड क्रॉस रक्तपेढी रत्नागिरी यांच्या विशेष सहकार्याने 11 जुलै रोजी महारक्तदान शिबिर राधाताई लाड सभागृह वैश्य भवन चिपळूण येथे अतिशय उत्तम आयोजनामध्ये संपन्न झाले. रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस असून देखील सदर रक्तदान शिबिरामध्ये 60 रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले. कोणत्याही प्रकारे उद्घाटनाचा कार्यक्रम न करता आयोजकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रत्येक रक्तदात्यांना आयोजकांच्या वतीने तसेच रेडक्रॉस रक्तपेढीच्या वतीने गौरव पत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
अतुल संसारे यांनी प्रत्येक रक्तदात्यांना मास्क देण्यात आले. सदर रक्तदान शिबिरामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे, शारीरिक व्याधी, सुरू असलेले औषध उपचार तसेच लसीकरणानंतर रक्तदानाचा आवश्यक कालावधी कमी असणे अशा प्रकारच्या रक्तदान न केलेल्या परंतु रक्तदानाची इच्छा असलेल्या 20 पेक्षा जास्त व्यक्तींचा मास्क देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. सदर रक्तदान शिबिरामध्ये चिपळूण वैश्य समाजाचे अध्यक्ष पंकज कोळवळकर,आशिष खातू, भरत गांगण, मनोज भोजने, सुनील सावर्डेकर, शकील मुकादम, शैलेश वरवाटकर, सचिन रेडीज,सचिन कोकाटे, मल्लेश लकेश्री, समीर टाकळे, राहुल सावंत, सुधीर डाफळे, गजानन जोशी , विश्‍वनाथ वैद्य ,सचिन कुलकर्णी, पराग पुरोहित, सुनील जानवलकर, शिवाजी शिंदे, प्रवीण दिवटे, गजानन जोशी,नमिता कापडी, साक्षी थरवळ,,माधवी चिपळूणकर, अनिकेत कुमारी सिद्धि रेडीज,अमृता कुलकर्णी, सुरेन्द्र रेडीज, योगेश कोलगे , स्वप्निल साडविलकर, अमर माळी, प्रवीण कांबळे, विदेश महाकाळ, संतोष जाधव, राजन गुडेकर, सुचंद्र गांधी, योगेश साडविलकर, भरत गांधी, सिद्धेश कोळवणकर, सुखदा पाथरे, अथर्व कोलगे, शिवम गांधी, विनीत सुराणा,संजय टाकळे इत्यादी 60 रक्तदात्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिरासाठी सुचय रेडीज,पंकज कोळवणकर, सतीश खेडेकर, डॉ दीपक विखारे, हेमंत शिरगावकर, नरेंद्र बेलवलकर, जगदीश साडवीलकर,छाया खातू, गीता चिंगळे, विजय गांधी, विभावरी गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version