नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुका सिटीझन फोरम व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने रोह्यातील धावीर देवस्थानाच्या प्रांगणात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 142 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 43 जणांना मोतीबिंदू शास्त्रकियेसाठी नवीन पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
या शिबिराच्या प्रारंभी काश्मिरमध्ये शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख, दिलीप वडके, श्रीकांत ओक, मनोजकुमार शिंदे, महेश सरदार, राजेंद्र जाधव, संदीप सरफळे, इल्यास डबीर, निलेश शिर्के, अमोल देशमुख, सचिन शेडगे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. या शिबिरास माजी नगराध्यक्ष संजय कोनकर, समीर शेडगे, माजी उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, उस्मान रोहेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई, शैलेश रावकर, राजेश काफरे, परशुराम चव्हाण, भरत गुरव आदींनी सदिच्छा भेट दिली.

Exit mobile version