। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुका सिटीझन फोरम आणि पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 163 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 54 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नवीन पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित या शिबिरात हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ. संदेश पाटील, प्रतिभा गावीत, गायत्री चौरसिया, तान्या कटियार, समृद्धी, नरेश आवलर, शिल्पेश साठम आदींनी तपासणी कार्यात सहभाग घेतला. रोहा तालुका सिटीझंस फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख, महेश सरदार, संदीप सरफळे, इल्यास डबीर, निलेश शिर्के, प्रशांत देशमुख, शैलेश रावकर, राजेश काफरे, दिनेश जाधव, भावेश अग्रवाल, दिनेश मोहिते, समिधा अष्टीवकर यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
मोतीबिंदू शिबिरासाठी आशा सेविका संजिवनी चाळके, मंथना झुरे, सिमरन कडव, सुप्रिया बठारे, प्रज्ञा लहाने, प्रमिला भगत, प्राची वाघमारे, अंजिनी भगत, नंदिनी भोईर, सायली साबळे, सानिया काटे यांनी देखील सहकार्य केले. शिबिरासाठी दिलेल्या योगदानासाठी आशा सेविकांना सिटीझन फोरमतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब यांनी सहयोगी संस्थांचे आणि शिबिरासाठी परिश्रम घेणार्या सर्वांचे आभार मानले.