हातमाग कापड प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्राहकांच्या आग्रहास्तव 8 ऑक्टोबरपर्यंत वाढ

| अलिबाग | वार्ताहर |

अलिबाग येथील हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ग्राहकांच्या आग्रहास्तव दि. 8 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आले आहे. यावेळेस विविध प्रकारचे कपडे उपलब्ध असणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाऊराय हॅण्डलुम सोलापूर यांचे हातमाग कापड प्रसिद्धी व विक्री कार्यक्रमांतर्गत हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल, रायगड जिल्हा परिषदेजवळ, मुख्य पोस्ट ऑफिससमोर अलिबाग येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रदर्शन प्रमुख पांडुरंग पोतन यांनी सांगितले. ते म्हणाले की, यांत्रिक युगामध्ये स्पर्धा करीत सर्व समस्यांशी सामना करून त्यांचे पिढीजात पारंपरिक हातमागावर समृद्धीचे वस्त्र विणण्याचे आणि वस्त्र संस्कृतीच्या अमूल्य ठेवा जोपासण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या गतिशील प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे व त्यांनी तयार केलेल्या हातमाग कापडाला योग्य बाजारपेठ मिळावी त्याकरिता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Exit mobile version