आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

| नेरळ | प्रतिनिधी |

डिकसळ गावातील तरुण कार्यकर्ते रोशन साळुंखे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील 350 हून अधिक लोकांनी शिबिरातील विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेतला.

आरोग्य शिबीर रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने रोशन रामचंद्र साळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त डिकसळ येथील रोहित मंगल कार्यालयात आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत शस्त्रक्रिया तसेच रक्तदाब, मधुमेह तपासणी यांच्यासह जनरल हाडांचे आजार, कंबरदुखी, छाती कॅन्सर, ओरल तोंडाचा कॅन्सर, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, दात-नाक-घसा तपासणी यांच्यासह सोनोग्राफी, सिटीस्कॅन, ब्लड टेस्ट, ईसीजी एक्स-रे इत्यादी सेवा देण्यात आल्या. तसेच, आळंदीची पायी वारी करणाऱ्या वारकरी संप्रदायातील वारकरी व ज्येष्ठ नागरिकांसाठी फूट म्हणजे पायाची मसाज करण्यात आली. यामध्ये अनेक वारकऱ्यांनी सहभाग दर्शवला असून पायाची मसाज करण्यात आल्या. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान करून पवित्र कार्याला शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version