। चिपळूण । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील मुसाडचे माजी सरपंच लक्ष्मणराव श्रीरंगराव सुर्वे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त निर्मल ग्रामपंचायत मुसाड , व लाईफकेअर हॉस्पिटल , चिपळूण यांच्या विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न झाले होते. सदर शिबिराचा सर्वाधिक ग्रामस्थांनी लाभ घेतला .
या मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या माध्यमातुन रुग्णांची तपासणी करून त्यांना ई.सी.जी. , रक्ततपासणी , मोफत औषध वाटप , मोफत नेत्र तपासणी , कॅन्सरची मोफत तपासणी , डॉक्टरांचा मोफत सल्ला व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सुविधांचे मार्गदर्शन करून हे शिबीर संपन्न झाले सरपंच मयुरी निर्मळ , उपसरपंच मानसिंग सुर्वे , जयश्री सुर्वे , ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ राजा सुर्वे व श्रीधर सुर्वे यांनी मोलाचे सहकार्य केले . तसेच डॉ . अंशुमन खोब्रागडे ( स्त्रीरोग तज्ञ ) , डॉ . प्राची दिलवाले , डॉ . सिमरन अत्तार आणि श्री . अभिजीत सुर्वे व लाईफकेअर हॉस्पिटल टिम यांनी सहकार्य केले.