महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नायब तहसीलदारांच्या हस्ते उद्घाटन
। कोर्लई । वार्ताहर ।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने संपूर्ण रायगड जिल्ह्यात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मुरुडमध्ये ग्रामीण रुग्णालयात आयोजित महाशिबिराला शहर तालुक्यासह आजुबाजूच्या परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन तहसील कार्यालयाचे महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून उपस्थित लोकांची कान नाक घसा, लहान मुलांचे आजार, किडनी विकार, हृदयरोग, पोटाचे विकार, डोळ्यांचे विकार, त्वचारोग, दंतरोग विकार, मुतखडा, स्त्रीयांचे आजार, हाडांचे आजार आदी आरोग्य तपासणी करण्यात येऊन रुग्णांना मोफत औषधे व आरोग्य कार्ड देण्यात आले. यावेळी दोनशेहून अधिकजणांनी लाभ घेतला. सुत्रसंचालन विजय सुर्वे, विठ्ठल शिंदे यांनी केले. सुहास सानप, ओमकार कोरमवार, अधिपरिचारिका निर्मला भोसले, क्ष-तंत्रज्ञ श्रुतिका कांबळे, सचीन जाधव, बालाजी घाटे, दिपेश गुरव, दक्षता गुरव आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Exit mobile version