गणित संबोध परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंत नगर नांदगाव हायस्कूल येथे इयत्ता पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयाची भीती कमी व्हावी व गुणवत्ता वाढवण्यासाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. गणितीय संबोध आकलन होण्यकामी सदरची परीक्षा ही खूप महत्त्वाची मानली जाते. परीक्षेचा उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी सुधा उपयुक्त ठरतो. या परीक्षेस नांदगाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यात इयत्ता पाचवीमधील 41 तर आठवीमधील 127 असे एकूण 168 विद्यार्थी या परीक्षेत बसले होते.

परीक्षेसाठी परीक्षा प्रमुख म्हणून नियती ठमके यांनी कामकाज पाहिले. जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेस बसावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ व अर्चना खोत यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी प्रतीक पेडणेकर, निशा बिरवाडकर, दत्ता खुळपे त्याच बरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले आहे.

Exit mobile version