। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पालीतील नगर पंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत शेकाप,राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराात आघाडी धेतली असून,उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाररॅली काढून मतदारांशी घरोघरी संपर्क साधण्यात आला.
या निवडणुकीत शेकाप व राष्ट्रवादी आघाडीच्या माध्यमातून 13 प्रभागात उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी ,शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दि.(16)रोजी प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकाप राष्ट्रवादी आघाडीचा विजय असो विजय असो या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला.
पाली शहराचा सर्वांगीण व शाश्वत विकास घडविण्याचा आमचा दृष्टिकोन आहे, अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा विकास करताना जनतेला मूलभूत व पायाभूत नागरि सेवासुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. पालीचा मतदार सूज्ञ आहे. जनता आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देईल असा विश्वास आहे.
आ.अनिकेत तटकरे
यावेळी शेकाप नेते सुरेशशेठ खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष गीताताई पालरेचा, राष्ट्रवादी सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा.म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे,राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर,पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष सुजाता वडके, नीलम पालकर, वैशाली पालकर, रेखा साळुंके, रुचिता बेलोसे , संगीता साखरले, हर्षा चांदोरकर, सुधागड तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे,तालुका चिटणीस उत्तमराव देशमुख, राजाराम देशमुख, राजेश गोळे, शेकाप पाली शहर अध्यक्ष जनार्दन जोशी, प्रियांका पालरेचा, पराग मेहता, सुधीर साखरले, युवक जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, संजोग शेठ ,पप्पू परबलकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, विठ्ठल सिंदकर, शशिकांत पाशीलकर, संतोष धाटवकर, अशोक शहा, योगेश शहा, विनायक जाधव,शशिकांत दंत, दीपक पवार, विनायक जाधव, सचिन साठे, रवी जाधव, अमित वरंडे,आरिफ मणियार, सुधीर साखरले, सुलतान बेनसेकर, मह्म्मदभाई धनसे, ललित ठोंबरे,महेश खंडागळे, किरण खंडागळे, इसाक पानसरे, विनय मराठे, इम्प्तीयाज पठाण, आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.