एआय आणि पर्यावरणामध्ये काम करण्याची गरज: अतुल म्हात्रे
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत आणि खालापूर तालुक्यातील तरुणांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यासाठी शेकडो तरुण तरुणी यांनी गर्दी केली होती. शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल 900 तरुणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यावेळी तब्बल 200 हुन अधिक तरूणांना विविध कंपंन्यांमध्ये नोकरीचे ऑफर लेटर देण्यात आली. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने या रोजगार मेळाव्याचे निमित्ताने कर्जत येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी तरुणांना मार्गदर्शन करतांना आयोजक अतुल म्हात्रे यांनी तरुणांनी एआय आणि पर्यावरण या विषयाकडे लक्ष देण्याची गरज असून, ही नवीन क्षेत्र नोकऱ्यांमध्ये आली असल्याने त्यांचे शिक्षण घेण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन अतुल म्हात्रे यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोजगार मेळावा कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयाच्या सेमिनार हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील तसेच खालापूर औद्योगिक वसाहती मधील विविध कंपन्या यांनी सहभाग घेतला होता. हाऊस किपींग आणि सेवा पुरवणाऱ्या क्षेत्रातील ब्लिंकिंट तसेच एचडीएफसी, आयसीआयसीआय, एलआयसी या बँका तसेच गोदरेज, इंटेरिओ, सिएट, टाटा स्ट्रीव्ह या कंपन्यांचे अधिकारी या रोजगार मेळाव्यात आल्या होत्या. या मेळाव्याचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला राज्य अध्यक्ष मानसी म्हात्रे, ॲड. गौतम पाटील, जिल्हा खजिनदार श्रीराम राणे, तालुका चिटणीस तानाजी मते, खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील, खालापूर नगरपंचायत उप नगराध्यक्ष संतोष जंगम, माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, कर्जत तालुका युवक अध्यक्ष अनिल जोशी, महिला तालुका अध्यक्ष स्वीटी बार्शी, कर्जत उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश फराट, माजी सभापती गजानन पेमारे, रायगड जिल्हा सहकारी बँक माजी संचालक राजेंद्र हजारे, जिल्हा कार्यकारिणी चिटणीस मंडळ सदस्य पुंडलिक शिनारे, पांडुरंग बडे , बबन भालेराव, तालुका उपाध्यक्ष मंदा म्हात्रे, तालुका सह चिटणीस रवींद्र भोईर, अशोक भुसाल, शिवाजी भगत, संतोष वैखरी, दिलीप वैखरे, अनंत दळवी, विष्णू कालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यासाठी तब्बल 900 तरुणांनीं व ऑनलाईन नोंदणी केली होती, तर तेवढच तरुण या वेळी वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित होते. यावेळी 200 हुन अधिक तरुणांना तात्काळ ऑफर लेटर देण्यात आली. त्यात सर्व यंत्रणा ऑनलाईन असल्याने अर्ज करणाऱ्या तरुणांना त्यांचे मेल वर थेट ऑफर लेटर पाठवली जात असल्याचे आयोजक तानाजी मते आणि अनिल जोशी यांनी जाहीर केले. त्यात ज्या ज्या तरुणांना नोकऱ्या मिळणार नाही त्यांनी आपल्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयातून नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आयोजकांनी जाहीर केले.
मुख्य आयोजक अतुल म्हात्रे यांनी सध्याच्या युगात एआय प्रशिक्षण महत्वाचे असून, आगामी काळात एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या देखील जाऊ शकतात. ए आय चे महत्व लक्षात घेऊन आम्ही या तंत्रज्ञान शिकावे यासाठी कोर्सेस सुरु करीत असल्याची माहिती दिली. त्याचेवेळी कौशल्य विकासावर आपण सर्वांनी भर द्यायला हवा असे आवाहन करतं सर्टिफिकेट कोर्सेस यांच्यावर भर द्यावा असे आवाहन केले. पर्यावरण हे क्षेत्र नव्याने आव्हाने निर्माण करीत असून, या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकत असे विधान अतुल म्हात्रे यांनी भविष्यात आम्ही पर्यावरण विषयावर काम सुरू केले असून, असे सर्टिफाईट कोर्स सुरू करीत आहोत. त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण देणारे प्रकल्प आम्ही देण्याचा प्रयत्न असून, प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात पर्यावरण राखण्याचे कार्य केले जात आहे. मात्र, त्या विषयावर आपण कोर्सेस सुरु करीत असून, या सर्व नवीन आव्हाने यांचे चॅलेंज आम्ही स्वीकारले अशी माहिती अतुल म्हात्रे यांनी दिली.







