| उरण | वार्ताहर |
मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराला उरण तालुका व शहरांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच त्यांच्या प्रचारार्थ उरण शहरांमध्ये माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, आप व रिपब्लिकन गट व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला. या प्रचार रॅलीला उरणकरांनी अतिशय चांगला असा प्रतिसाद दिला. यावेळी मा.आ. मनोहरशेठ भोईर यांचे संपर्क कार्यालय हे उरण साठी प्रचार कार्यालय म्हणून त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या रॅलीला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड भूषण पाटील, सुमनताई पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे काका पाटील, रमाकांत म्हात्रे, तालुका संपर्कप्रमुख दीपक भोईर, मार्तंड नाखवा, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील, शेकापक्ष तालुका अध्यक्ष सीमा घरत, वंदना पवार, नगरसेवक अतुल ठाकूर, निलेश भोईर, अफशा मुकरी, अन्वर कुरेशी, शादाब शेख, शहर प्रमुख विनोद म्हात्रे, अखलाज सिलोत्री, लॉटरी शेखर पाटील, महिला आघाडीच्या नायदा ठाकूर, हुसेना शेख, मुमताज भाटकर, रुबीना कुट्टी, हसीमा सरदार, प्रवीण मुकादम, गणेश पाटील, चेतन म्हात्रे, गुलजार भाटकर ,काफिल फसाटे, फतेह खान, विकी म्हात्रे, गणेश संदीप जाधव, संजय गावंड महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.