अलिबाग | प्रतिनिधी |
आदर्श पतसंस्था, अलिबागच्या श्रीबाग शाखा तृतीय वर्धापन दिननिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक अभिजित पाटील यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात झाली. यावेळी आदर्शचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतीश प्रधान, संचालक जगदीश पाटील, सीईओे मीनाक्षी पाटील,ब्लड बँकेचे डॉ. दीपक गोसावी, शाखा सल्लागार विजय पाटील ब्लड बँकेचे कर्मचारी , आदर्श पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.






