श्रीगणेश शिर्की संघ अजिंक्य
| हमरापूर । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील बोर्वे येथील हनुमान क्रिडा मंडळाचेवतीने आयोजित कबड्डी स्पर्धेत श्रीगणेश शिर्की हा संघ अजिंक्य ठरला आहे. या स्पर्धेचे उदघाटन नंदा म्हात्रे व वैकुंठ पाटील यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण नंदेश पाटील, विठोबा भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेला मिलिंद पाटील, ललित पाटील, गणेश पाटील, आर जे म्हात्रे, गणेश पाटील, कुणाल पाटील, शारदा म्हात्रे, विनोद पाटील, दिप्ती गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक श्री गणेश शिर्की, द्वितीय क्रमांक अंबिका मळेघर, तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर कोलवे, चतुर्थ क्रमांक विजय म्हसोबा शिर्की चाल नं 2 या संघांनी पटकावला. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मंथन म्हात्रे या खेळाडूस कुलर देवून गौरविण्यात आले आहे. तर पब्लिक हिरो- श्रेयस पाटील (विजय म्हसोबा शिर्की चाल), उत्कृष्ट पकड – ऋतिक कोळी(ज्ञानेश्वर कोळवे), उत्कृश्ट चढाई – सोहम पाटील (अंबिका मालेघर) यांना मनगटी घड्याळ देवून गौरविण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हनुमान क्रीडा मंडळ व श्री राम मंडळाच्या सर्व खेळाडूंनी अथक परिश्रम केले व सामन्यांचे समालोचन अनिल भोईर यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले.