। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील उतेखोल बीट स्तरावरील क्रीडा आणि व्यक्तीमत्व विकास स्पर्धा जावळी हायस्कूल येथे शुक्रवारी (दि.13) उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माणगाव गट शिक्षण अधिकारी सुरेखा तांबट यांचे हस्ते करण्यात आले.
स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती अध्यक्षा विनया जाधव यांनी बक्षीसे म्हणून आकर्षक चषक दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उतेखोल केंद्र प्रमुख शंकर शिंदे, प्रकाश उभारे, गणेश खामकर, संतोष मालोरे, विलास गिते, मुख्याध्यापक बरगे, निलेश साळवी, बोरसे, विनया जाधव, अरुणा भांडवीलकर, शुभांगी जाधव, स्मिता पाबरेकर, दिनेश खडतर, अस्मिता खडतर, केकाणे तसेच पालक वर्ग, शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी तालुका स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
लहान गटः
लगोरी स्पर्धाः प्रथम- उतेखोल, द्वितीय- ढालघर. लंगडी: प्रथम- ढालघर, द्वितीय- उतेखोल. पाऱंपारीक नृत्य: प्रथम- उतेखोल, ढालघर, द्वितीय- पेणतळे, तृतीय- पळसगाव. समूहगीत: प्रथम- उतेखोल, द्वितीय- ढालघर, तृतीय- पळसगाव. पथनाट्य: प्रथम- पेण/तळे, द्वितीय- उतेखोल, तृतीय- ढालघर. माती शिल्प: प्रथम- उतेखोल, द्वितीय- पळसगाव, तृतीय- ढालघर. दोरी उड्या: प्रथम- पळसगाव, द्वितीय- ढालघर, तृतीय- उतेखोल. बेचकिने नेम धरणे: प्रथम- गांगवली, द्वितीय- पेण तर्फे तळे, तृतीय- पळसगाव.
मोठा गटः
लगोरी: प्रथम- गांगवली, द्वितीय- पेण तर्फे तळे, तृतीय- पळसगाव. लंगडी: प्रथम- गांगवली, द्वितीय- पेण तर्फे तळे. समूह गीत: प्रथम- गांगवली, द्वितीय- पळसगाव, तृतीय- पेण तर्फे तळे. पथनाट्य: प्रथम- पळसगाव, द्वितीय- पेण तर्फे तळे, तृतीय- गांगवली. पारंपरिक नृत्य: प्रथम- पेण तर्फे तळे, द्वितीय- गांगवली. माती शिल्प: प्रथम- पेण तर्फे तळे, द्वितीय- पळसगाव. दोरी उड्या: प्रथम- गांगवली, द्वितीय- पेण तर्फे तळे, तृतीय- पळसगाव. बेचकिने नेम धरणे: प्रथम- पेण तर्फे तळे, द्वितीय- गांगवली, तृतीय- पळसगाव.





