नाईक महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर महाविद्यालयात सहशैक्षणिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ प्राचार्य डॉ. एम. एन. नगरबावडी, उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. चव्हाण व क्रीडा प्रमुख डॉ. एस. एल. म्हात्रे. व सर्व प्राध्यापक वर्ग यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यास्पर्धा 1 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहेत. स्पर्धांमध्ये गोलाफेक, भालाभेक, थाळीफेक, कॅरम, बुद्धिबळ, धावणे तसेच क्रिकेट, कब्बडी, खो-खो, व्हॉलीबॉल, रस्सीखेच या सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्य, उपप्राचार्य व क्रीडा समिती सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version