| माणगाव | प्रतिनिधी |
हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स आणि हिरवळ रात्र महाविद्यालय महाड यांच्या संयुक्त विद्यमाने कालावधीत महाविद्यालयात विविध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे तरंग-2022 चे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांमधील खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी महाविद्यालयात बॅडमिंटन, चेस, कॅरम, व्हॉलीबॉल, कबड्डी या सारख्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव देण्याकरिता महाविद्यालयात कॉलाज, पेंटिंग, फूड, फ्रूट, फ्लॉवर डेकोरेशन ,प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील नृत्य कला, गायन कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या विविध सुप्त कलागुणांचे प्रदर्शन केले.
तरंग या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोर धारिया, जयवंराव देशमुख सरपंच वरंध, पराग प्रभुदेसाई, दानिश मुजावर, संतोष बुटाला, प्राचार्य सुदेश कदम, प्राचार्या विद्या गुजर उपस्थित होते.
कोरोना काळात ऑनलाईन झालेली शैक्षणिक पद्धतीसाठी आवश्यक असणारी इंटरनेट सेवा सर्वच विद्यार्थ्यांना परवडणारी आहेच अस नाही आणि म्हणूनच हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर भाई धारिया यांनी काळाची गरज ओळखून मायक्रोस्कॅन या कंपनीच्या मदतीने खास महाड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना परवडेल अशी एक नवीन इंटरनेट योजना सर्वान समोर सादर केली आणि त्याच इंटरनेट योजनेचे उद् घाटन तरंग या कार्यक्रमाचे औचित्य साधुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पराग प्रभुदेसाई, किशोर धारिया, सोनाली धारिया, डॉ. संध्या कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.