मजगांव शाळेत रंगल्या क्रीडा स्पर्धां

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा मजगांव मराठी शाळेत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत 4 दिवस विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यातील पहिल्या दिवशी सांघिक स्पर्धाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निखील मानाजी, उपाध्यक्ष उमेश कोंडाजी, अमित कोळी, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कबड्डीच्या मैदानात विधिवत पूजा करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धाचे क्रीडाप्रमुख चेतन चव्हाण यांनी खेळास प्रारंभ करण्यापूर्वी खेळाडूंना शपथ दिली. शाळेचे मुख्याध्यापक हेमकांत गोयजी यांनी क्रीडास्पर्धेचा उद्देश स्पष्ट करून खेळाडू विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मजगांव पंचक्रोशीतील कबड्डीपट्टू मिथून भोईर व संदिप कोटकर यांनी पंच म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत तब्बल 16 संघानी सहभाग घेतला. यावेळी मुले व मुलींचे कबड्डी, रिले, डॉजबॉल व रस्सीखेच या सांघिक खेळाचा आनंद मुलांनी घेतला. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी हर्षा नांदगावकर, प्रमिला फुंदे, रंजिता केमकर, मनिषा वाघरे, सिद्धेश फेंगडू, श्रुती आयरकर व नेहा डावरे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version