। खरोशी । वार्ताहर ।
शालेय जीवनातील क्रीडा स्पर्धांमधून उद्याचे खेळाडू घडतील, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नीलिमा पाटील यांनी आराव येथे गागोदे केंद्राच्यावतीने आयोजित क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धांच्या प्रसंगी केले आहे.
निलिमा पाटील पुढे म्हणाल्या की, वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांना काहीतरी बदल हवा असतो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे उपजत कला व क्रीडा गुण असतात त्यांना अशा स्पर्धांमधून चालना मिळते व आवडही निर्माण होते. अशा स्पर्धांमधूनच एखादा विद्यार्थी अभिनव बिंद्रा, पी.टी. उषा म्हणून उदयाला येऊ शकते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी गागोदे केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कोठेकर, सचिन सावंत, देवजी भोसले, दत्ताराम सावंत, तृप्ती पुगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. तर, परीक्षणाचे काम सुजित नागे, छाया पाटील, नलिनी मोकल, ज्ञानेश्वर पवार यांनी पार पाडले.