। माणगाव । प्रतिनिधी ।
वावेदिवाळी केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तीमत्व विकास स्पर्धा रा.जि.प.शाळा विठ्ठलवाडी येथे अतिशय उत्साहात पार पडल्या. यावेळी उद्घाटनप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत भुवन सरपंच दिपक जाधव, उपसरपंच जयेश पवार, भास्कर यादव, तळा तालुका नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिंदे, राम शिंदे, राम कसबले, निकेश पवार आदि उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले.
प्रास्ताविकात वावेदिवाळी केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख सुधीर निकम यांनी स्पर्धेचे स्वरुप स्पष्ट केले. यावेळी आपल्या मनोगतात सरपंच दिपक जाधव यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात क्रीडा स्पर्धाचे अनन्यसाधारण महत्त्व असून या स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते. आम्ही सुध्दा अशाच विविध स्पर्धामधून घडलो असून आमच्या शिक्षकांचे ऋण आम्ही कधीही विसरु शकत नाही. सर्व विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे खेळात सहभागी होऊन खेळाडूवृत्ती जोपासावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी उपसरपंच जयेश पवार, गोविंद शिंदे, तळा नायब तहसीलदार जितेंद्र टेंबे यांनीही समयोचित मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे संयोजक रा.जि.प.शाळा विठ्ठलवाडी मुख्याध्यापिका लता दांडेकर व उपशिक्षिका शितल बामुगडे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अपार मेहनत घेतली. माध्यमिक विद्यामंदिर रातवड हायस्कूलचे सहशिक्षक अजित शेडगे यांनीही स्पर्धांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी दोरीउडी स्पर्धा– प्रथम क्रमांक सांची किरण कानाडे, द्वितीय क्रमांक स्वरा संदेश पवार, तृतीय क्रमांक सिध्दिका संजय वाघमारे, बेचकी स्पर्धा – प्रथम क्रमांक आशिष सुरेश वाघमारे, द्वितीय क्रमांक शैलेश सुरेश हिलम, तृतीय क्रमांक निलेश गणेश जगताप, नृत्य स्पर्धा – प्रथम क्रमांक शाळा घोटवळ, द्वितीय क्रमांक धरणाची वाडी, तृतीय क्रमांक रातवड, माती शिल्प स्पर्धा – प्रथम क्रमांक कैवल्य कल्पेश पवार, द्वितीय क्रमांक साक्षी बाळाराम वाघमारे, तृतीय क्रमांक नील सूचन कदम, समुहगीत स्पर्धा – प्रथम क्रमांक घोटवळ, द्वितीय क्रमांक रातवड, तृतीय क्रमांक शाळा वडाची वाडी तर पथनाट्य स्पर्धा – रा,जि.प. शाळा घोटवळ हि विजेती ठरली. सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.