क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन आवश्यक- चित्रलेखा पाटील

वेश्‍वीमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा

। अलिबाग । संतोष राऊळ ।

कबड्डी, क्रिकेट या खेळांसह शरीरसौष्ठव खेळात सुद्धा अलिबाग तालुका असा  प्रगती करतोय हे बघून अतिशय आनंद होतोय. कुठलाही खेळ असो वा कुठलीही प्रगती असो त्यासाठी व्यासपीठ देणं महत्वाचं असते,असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी वेश्‍वी, ता.अलिबाग येथे केले.


रायगड बॉडी बिल्डिंग असोसिएशन, महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन व इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या मान्यतेने ओंकार क्रीडा मंडळ व मा. आमदार भाई जयंत पाटील व्यायामशाळा, वेश्‍वी- अलिबाग आयोजित ‘ओंकार रायगड श्री- 2023’ भव्य शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, सवाई पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, किरण कोसमकर, राजेंद्र चव्हाण, उपसरपंच आरती पाटील, सदस्य, ग्रामस्थ व शरीरसौष्ठव प्रेमी मोठ्या संख्येने उपसथित होते. मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कबड्डी सारख्या खेळानंतर प्रथमच बॉडी बिल्डिंग सारखा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ओंकार क्रीडा मंडळ, माजी सरपंच प्रफुल्ल पाटील आणि वेश्‍वी ग्रामस्थांचे कौतुक केलं. तसेच ओंकार क्रीडा मंडळाने ह्या व्यासपीठावर बोलवल्याबद्दल आणि कायमच प्रेम आणि विश्‍वास दाखवल्या बद्दल आभार मानले. आलेल्या खेळाडूंना प्रोत्साहित केले. प्रफुल्ल पाटील आणि ओंकार क्रीडा मंडळ अशाप्रकारे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे म्हणून शेकाप या स्पर्धेला पाठिंबा देत आहे. याचा फायदा  शरीरसौष्ठवपटूंना  होणार आहे. वेश्‍वी गावात सुद्धा खूप बॉडी बिल्डर्स आहेत. ज्यांनी खुप मेहनत घेऊन गावासाठी खूप पदक मिळवली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


या शरीरसौष्ठव स्पर्धेत शीर्षक विजेत्याला 25 हजार रुपये तर उपविजेत्याला 10 हजार रुपये, तसेच बेस्ट पोझरला 3 हजार रुपये रोख रक्कम, पारितोषीक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच एक ते सहा गटातील पहिल्या क्रमांकासाठी 5 हजार रुपये, दुसर्‍या क्रमांकासाठी 3 हजार रुपये, तिसर्‍या क्रमांकासाठी 2 हजार रुपये आणि चौथ्या व पाचव्या क्रमांकासाठी प्रत्येकी 1 हजार रुपये रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धेत रायगड सह, मुंबई शहर, ठाणे, मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील व नवी मुंबईमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

कोणताही खेळ असो वा कला, प्रत्येकाला व्यासपीठ देण्याचं काम हा शेतकरी कामगार पक्ष नेहमीच करत असतो. या पुढे ओंकार वेश्‍वी क्रीडा मंडळाला योग्य ते सहकार्य  शेकाप कर्तव्य म्हणून करेल.

 चित्रलेखा पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख

स्पर्धेचा निकाल
शीर्षक विजेता- हबीब सय्यद, ठाणे
उपविजेता- नितीन म्हात्रे, ठाणे
बेस्ट पोझर- सम्राट ढाले, मुंबई उपनगर

55 किलो वजनी गट
पहिला क्रमांक- नितीन शिगवणे, मुंबई उपनगर
दुसरा क्रमांक- संजय भोपी, ठाणे
तिसरा क्रमांक- सुनील सावंत, ठाणे
चौथा क्रमांक- संदेश भोईर, रायगड
पाचवा क्रमांक- प्रणय पुडकर, रायगड

60 किलो वजनी गट
पहिला क्रमांक- देवेश पाटील, ठाणे
दुसरा क्रमांक- प्रणव पुजारी, रायगड
तिसरा क्रमांक- जगदीश मुळकर, रायगड
चौथा क्रमांक- हृषीकेश म्हात्रे, रायगड
पाचवा क्रमांक- जयेश म्हात्रे, रायगड

65 किलो वजनी गट
पहिला क्रमांक- नितीन म्हात्रे, ठाणे
दुसरा क्रमांक- अरुण पाटील, मुंबई उपनगर
तिसरा क्रमांक- वैभव म्हात्रे, रायगड
चौथा क्रमांक- नितीन दाभाडे, रायगड
पाचवा क्रमांक- प्रशांत रोकडे, रायगड

70 किलो वजनी गट
पहिला क्रमांक- विनायक लोखंडे, ठाणे
दुसरा क्रमांक- आवेज शेख, रायगड
तिसरा क्रमांक- चिराग पाटील, रायगड
चौथा क्रमांक- संदेश म्हात्रे, ठाणे
पाचवा क्रमांक- जयेश गवणे, रायगड

75 किलो वजनी गट
पहिला क्रमांक- प्रतीक पांचाळ, मुंबई उपनगर
दुसरा क्रमांक- सचिन बहुतुले, रायगड
तिसरा क्रमांक- महेश शेट्टी, मुंबई
चौथा क्रमांक- श्रेयश म्हात्रे, रायगड
पाचवा क्रमांक- नितीन बिरवाडकर, रायगड

80 किलो वजनी गट
पहिला क्रमांक- हबीब सय्यद, ठाणे
दुसरा क्रमांक- राहुल क्षेत्रे, ठाणे
तिसरा क्रमांक- सम्राट ढाले, मुंबई उपनगर
चौथा क्रमांक- अभिशेख खेडेकर, मुंबई उपनगर
पाचवा क्रमांक- बॉबी पाटील, रायगड 

Exit mobile version