श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषकानंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर 27 जुलैपासून भारतीय संघाचा श्रीलंका दौराही नियोजित आहे आणि त्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर 3 टी-20 व 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. तसेच, झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार संघच कदाचित श्रीलंका दौऱ्यावरील टी-20 मालिकेत खेळेल. पण, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा लक्षात घेता एकदिवसीय मालिकेत वरिष्ठ खेळाडूंना खेळावे लागेल. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर हे एकदिवसीय मालिकेत दिसतील. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 27 जूलै, 28 जुलै व 30 जुलै रोजी टी-20 सामने खेळेल. त्यानंतर 2 ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून त्यातील दुसरा व तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे 4 व 7 ऑगस्टला खेळवला जाणार आहे.

Exit mobile version