| दापोली | वार्ताहर |
दापोली तालुक्यातील दाभीळ (मोरेवाडी) येथील श्री सद्गुरु क्रिकेट क्लब तर्फे ‘श्री सद्गुरू चषक 2024’ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दापोली तालुक्यातील एकूण चोवीस क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. ॐ बेलेश्वर संंघ (करंजाळी) व रुखी क्रिकेट संघ (दापोली) या दोन संघात विजयासाठी अंतिम लढत झाली. यामध्ये दापोलीच्या रुखी क्रिकेट संघाने अजिंक्य पद पटकावले. स्पर्धेतील अंतिम सामन्याची चुरस पाहण्यासाठी दापोली तालुका तसेच शेजारील खेडेगावातील क्रिकेट चाहते बहुसंख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धा ठाणे शहरातील कलवा येथील पटनी मैदानावर अत्यंत उल्हासित वातावरणात पार पडली.