पेझारीत श्रीदत्तजयंती उत्सव सोहळा

दोन दिवस विविध कार्यक्रम
। अलिबाग । वार्ताहर ।
श्री. दत्तजयंती निमित्त रायगड जिल्हा श्रीपंत सांप्रदायाचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीदत्त मंदिरात मंगळवारी 6 व बुधवार 7 डिसेंबर 2022 असे दोन दिवस 57 व्या श्रीदत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हा प्रमुख व श्रीपंत भक्त मंडळ पेझारीचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी दिली आहे.

मंगळवार 6 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता प्रेमध्वज पालखी सोहळा श्रीदत्त मंदिरातून निघेल. हा पालखी सोहळा नवजीवन, वरची आळी, खालची आळी, भैरवनाथ, नवीन वसाहत, सरकारी दवाखाना, आंबेपूर, पेझारी नाका मार्गे श्रीदत्त मंदिरासमोर येईल. सायंकाळी 7 वाजता श्रीदत्त मंदिरासमोर शिवाय नमः व दत्तगुरू जय दत्तगुरू या गजरात प्रेमध्वजारोहण होईल. बुधवार 7 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता श्रींची पूजा व अभिषेक, पहाटे 5.30 वाजता श्री दत्तात्रेय सहस्रनामावली, सकाळी 7 वाजता प्रेमध्वज पालखी सोहळ्याचे प्रस्थान हा पालखी सोहळा श्रीदत्त मंदिरातून निघून पाटील आळी, आस्तान आळी, ढोलपाडा, गणपती मंदिर दिवलांग, हनुमान मंदिर मार्गे श्रीदत्त मंदिरात परत येईल. दुपारी 1.30 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 5.30 ते 7.00 या वेळेत श्रीदत्त जन्मोत्सव मुख्य सोहळा, सायंकाळी 7 वाजता प्रेमळ सुनंदाताई राणे महिला मंडळ पेझारी यांचे भजन, रात्री 8.30 वाजता श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीदत्त प्रेमलहरी या भजनगाथेतील पदांवर टिपरी नृत्याचा कार्यक्रम होईल व रात्री 10 वाजता आरती अवधूताने श्रीदत्त जयंती उत्सवाची सांगता होईल.

बुधवार 7 डिसेंबर रोजी श्रीदत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांना घेता यावा यासाठी महाप्रसाद वाटपाचे शिस्तबद्ध असे नियोजन करण्यात येणार आहे. या दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने 2023 या नवीन वर्षाची अवधूत दिनदर्शिका भाविकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक, भक्त व गुरूबंधू भगिनींनी 6 व 7 डिसेंबर 2022 रोजी होत असलेल्या श्रीदत्त जयंती उत्सवाचा आनंद लुटावा असे उत्सव समिती, श्रीपंत भक्त मंडळ पेझारी ता. अलिबाग यांनी सांगितले आहे.

Exit mobile version