| खारेपाट | वार्ताहर |
डोलवी येथे श्री. टाकादेवी क्रीडा मंडळ उघडआळी मधलापाडा यांच्यातील सरपंच-उपसरपंच चषक 65 किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कबड्डी स्पर्धचे उद्घाटन जेएसडब्ल्यू कंपनीचे आत्माराम बेतळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम संघ गडब, द्वितीय क्रमांक शिर्की चाळ नं. 2 तर तृतीय क्रमांक उचेडे व सत्यनारायण नवेगाव यांनी पटकावला.
बक्षिस वितरण सरपंच परशुराम म्हात्रे व रोहन म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी माजी शिक्षण आरोग्य सभापती सुरेश म्हात्रे, अनिल म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, आदी पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किशोर म्हात्रे, देवनाथ पाटील, अमृत पाटील, महेंद्र पाटील यावेळी विशेष मेहनत घेतली. आकाश म्हात्रे, स्वप्नील म्हात्रे, अक्षय म्हात्रे, स्नेहल म्हात्रे, पिंट्या म्हात्रे, मनोज पाटील, दामाजी म्हात्रे, विक्रम म्हात्रे, किशोर पाटील, महेंद्र पाटील, विनायक पाटील, विक्रांत कोठेकर, अजिंक्य म्हात्रे, अल्पेश म्हात्रे, मनिष म्हात्रे, परेश पाटील, राज म्हात्रे, संचित पाटील, सुरज पाटील, तेजश पाटील, पन्या म्हात्रे या सभासदांनी विशेष मेहनत घेतली.