ब्रह्मचैतन्य संगीत सभेत श्रीरंग भावे यांचे गायन

| पनवेल | प्रतिनिधी |
ब्रह्मचैतन्य मासिक संगीत सभेमधे प्रसिद्ध कलाकार श्रीरंग भावे यांचे गायन संपन्न झाले. पनवेल येथील गोंदवलेकर महाराज नामस्मरण केंद्रामधे हा कार्यक्रम संपन्न झाला. सरिता व राजेंद्र भावे, तसेच ग्वाल्हेर घराण्याचे डॉ.राम देशपांडे व पं.सुरेश बापट आणि पं. रामदास कामत यांच्याकडे संगीताचे धडे घेतलेल्या श्रीरंग भावे यांनी अत्यंत सुरेल, सुस्पष्ट आणि गोड स्वरांनी ब्रह्मचैतन्य संगीत सभेचे पंधरावे पुष्प रंगवले.

आजच्या मैफिलीची सुरुवात सूर निरागस हो या गाण्याने केली आणि मैफिलीचे प्रसन्न वातावरण निर्माण केले. त्यानंतर आरंभी वंदिन, कुश लव रामायण गाती ही पदे व रामभक्तीपर अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांवर आधारित दोन स्वरचित रचना अतिशय भावपूर्ण पध्दतीने सादर करून भक्तिमय केले. त्यानंतर विविध नाट्यपदे सादर करून मचिन्मया सकल हृदयाफ या पदाने गायनाची सांगता केली. अमेय भडसावळे यांनी ऑर्गन, गणेश घाणेकर यांनी तबला, सुरज गोंधळी यांनी पखवाज व समीर कर्वे यानी तालवाद्यसाथ केली. पर्णिका भडसावळे-जोशी यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

Exit mobile version