| रेवदंडा | वार्ताहर |
रेवदंड्यातील आदित्य मेडिकल स्टोअर्सचे संदिप खोत यांची स्नुषा सृष्टी आदित्य खोत हिने अमेरिकेतील युनिव्ह युर्निव्हसिटीमधून इन्फरमेशन सिस्टममध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केली. तिच्या सुयशाचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहे.
सृष्टी आदित्य खोत हिने लग्नानंतर उच्चशिक्षणासाठी सासरे संदिप खोत यांच्याकडे इच्छा व्यक्त केली. तिच्या इच्छेनुसार संदिप खोत यांनी तिला पुढील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील बिगहॅमटोन, स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क या युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षणासाठी पाठविले. तिथे तिने सासरच्या मंडळीने दिलेल्या पाठिंब्याने सुयश प्राप्त करून इन्फरमेशन सिस्टममध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केली. तिच्या कॉलेजचे डिन श्रीहरी व प्रेसिंडन्ट हार्वी यांच्या हस्ते पदवी दिक्षांत सोहळा ब्रिगहँमटोन-न्युयॉर्क येथे संपन्न झाला.





