| उरण | प्रतिनिधी |
जासई ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन मुक्ती पार्टी आघाडीचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. छाननीच्या वेळी जासई ग्रामपंचायतमधील वार्ड क्रमांक 3 मधील सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ अमर म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी उमेदवार भाजपाच्या पौर्णिमा कांबळे यांचा जात वैधता प्रमाणपत्र अर्ज बाद झाल्यामुळे आघाडीचा उमेदवार विजयी झाल्या.
बुधवारी (दि.25) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ सृष्टी अमर म्हात्रे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषीत केले. सृष्टी प्रकाश कांबळे उर्फ सृष्टी अमर म्हात्रे यांची बिनविरोध निवड जाहिर होताच त्यांचे माजी सभापती नरेश घरत व इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.