। श्रीवर्धन । वार्ताहर ।
जगातील सर्वप्रथम नामक ‘डिजिटल वॉटर बॅन्क’ सुरु करण्यात आलेल्या संस्थेमार्फत श्रीवर्धन शहराची या घटकांकरिता गुणवत्ता तपासणी करण्यात आली होती. या सर्व्हेमध्ये श्रीवर्धन नगर परिषदेस 62.51 इतकी गुणसंख्या प्राप्त झाली असून श्रीवर्धन नगर परिषद ही मानांकन प्राप्त करणारी महाराष्ट्र राज्यातील प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्था ठरली आहे.
जल या अति महत्वाच्या घटकाच्या गुणवत्तेची पारदर्शकता राखण्यासाठी त्याचे लेखापरीक्षण आणि पाण्याचे शाश्वत गुणांकन होणे आवश्यक आहे, ज्यातून श्रीवर्धन शहरातील पाण्याचा सुयोग्य वापर, पाण्याचे स्त्रोत आणि त्यांची क्षमता, पाण्याचा आवश्यक पुरवठा होत आहे की नाही आदिंची तपासणी या संस्थेमार्फत करण्यात आली होती. मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या पुढाकाराने श्रीवर्धन शहराचे शाश्वत जल परीक्षण करणे शक्य झाले आहे. तसेच, नुकतेच पूर्ण झालेल्या जल पुरवठा प्रकल्पामुळे श्रीवर्धन शहरातील पाण्याच्या सुयोग्य वापरास चालना मिळेल, असा विश्वास मुख्याधिकारी लबडे यांनी व्यक्त केला आहे.







