| श्रीवर्धन | वार्ताहर |
समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला. जीवरक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले नयन नारायण चोगले यांनी श्रीवर्धन पोलिसांना या घटनेची खबर दिली. त्यानंतर श्रीवर्धन पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. मृतदेहावरती कुत्र्याने चावल्याच्या खुणा असल्याचे देखील दिसून आले.
गेल्या अनेक दिवसांपासून जसवली फाटा, आराठी, श्रीवर्धन बाजारपेठ तसेच श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर सदरची महिला फिरत असल्याचे दिसून आले होते. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे.







