| रत्नागिरी | प्रतिनिधी |
रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ आयोजित 19वी जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धा येत्या 8 फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी एसआरके तायक्वांदो क्लबचा संघ जाहीर करण्यात आला.स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे 650हून अधिक खेळाडू यात आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धा प्रामुख्याने पुमसे आणि क्युरोगी या दोन प्रकारात पार पडणार आहेत. वयोगटानुसार 7, 12, 14, 18 वर्षांखालील आणि 18 वर्षांवरील (वरिष्ठ) अशा विविध गटांत हे सामने होतील.या स्पर्धेसाठी एसआरके तायक्वांदो क्लबचे साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून पी. वी. वयोगटासाठी समर्था बने, देवन सुपल, सबज्युनिअर वयोगटासाठी सुजल सोलंके, श्रुती चव्हाण, कॅडेट वयोगटासाठी वेदांत चव्हाण, पार्थ गावडे, कनिष्ठ वयोगटासाठी अमेय सावंत, वरिष्ठ वयोगटासाठी निखिल पवार यांची नावे संघ प्रशिक्षक म्हणून जाहीर करण्यात आली.
तायक्वांदो स्पर्धेसाठी ‘एसआरके’ सज्ज
