SRPF जवानाने झाडली स्वतःवर गोळी; मृत्यूच्या कारणाचा अद्याप खुलासा नाही

। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबईच्या डोंगरी परिसरात राज्य राखीव दलाच्या पुष्कर शिंदे या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्याने एसएलआर रायफल ने स्वतःला मानेखाली गोळी मारून घेतली. त्याने हे कृत्य का केलं, याबाबत कोणताही खुलासा झालेला नाही. तसेच त्याच्या कुटुंबीयांनीही अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्याची प्रक्रिया सुरू असून मंगळवारी (दि. २५) त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पुष्कर हा परिमंडळ १ कार्यक्षेत्रात मंत्रालयाच्या मुख्य गेटवर कर्तव्यात होता. या ठिकाणी बंदोबस्तात तो उपस्थितही होता. राज्य राखीव दलाच्या पुण्यातील डी कंपनीतील गट क्र. २ मध्ये तो सेवा देत असून त्याच्या प्लॅटूनचा क्रमाांक १ होता. घटना घडल्यानंतर तत्काळ कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. मंत्रालयातील नाईट शिफ्ट संपल्यानंतर कर्तव्य संपल्यानंतर प्लाटून म.न.पा. शाळा, डोंगरी येथे आल्यानंतर ९.५० वा हे कृत्य केलं.

Exit mobile version