सृष्टी मांगुळकरची मुंबई पोलीस दलात निवड

| खांब | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील श्री क्षेत्र तळवली या गावची सुकन्या सृष्टी नथुराम मांगुळकर हिची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. सृष्टी मांगुळकर ही अभ्यासाबरोबरच खेळ क्रीडा प्रकारात अतिशय निपुण व चपळ असल्याने तिला आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पारितोषिके मिळाली आहेत. शालेय जीवनातील क्रीडा प्रकारातील सहभाग व अनुभवाचा फायदा तिला पोलीस भरती प्रक्रियेत झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर सृष्टीनेही पोलीस होण्याचे स्वप्न शालेय जीवनापासूनच पाहिले होते व त्या दृष्टीने तिने देवा करिअर अकॅडमी भांडूप मुंबई या अकॅडमीमधून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेऊन व सातत्याने प्रयत्नांती पराकाष्ठा करून आपल्या स्वप्नाची पूर्तता केली आहे. सृष्टीच्या या मुंबई पोलीस दलातील निवडीबद्दल ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळ तळवली यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Exit mobile version