महाड- विन्हेरे रस्त्यावर एसटी बस- कारची समोरासमोर धडक

। महाड । प्रतिनिधी ।

महाड- विन्हेरे राज्य मार्गावर कुर्ला घाटात हॉटेल हिल् टाऊन जवळ समोरासमोर एसटी व कार यांच्यात अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि.29) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. महाड- विन्हेरे राज्य मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दापोली पिंपरी चिंचवड ही राज्य परिवहन महामंडळाची बस दापोली कडून पुण्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या कारची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे समजते.

Exit mobile version