परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
सरनाईक यांनी शुक्रवारी (दि. 11) वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांची भेट घेतली. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा झाली असून, तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारा निधी हा एक महिना आधीच एसटी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच, ज्या 1076 कोटींची मागणी एसटी महामंडळाने केली होती, त्यापैकी 120 कोटी आता देण्यात येणार आहेत. तर उर्वरित रक्कम तीन टप्प्यात एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून मिळणार आहे. तसेच, प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.