| नवी मुंबई | प्रतिनिधी |
अश्विनी बिद्रेच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसातील इनस्पेक्टर अभय कुरुंदकरला दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी आज होणार होती. परंतु, या प्रकरणाचा निकाल लांबणीवर पडला आहे. त्यांला न्यायालय काय शिक्षा सुनावणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. सुनावणीवेळी अश्विनी बिद्रे यांची मुलगी सिद्धी आणि पती राजू गोके यावेळी उपस्थित होते. या प्रकरणी न्यायाधिशांच्या प्रश्नाची उत्तरे देताना सिद्धीला अश्रू अनावर झाले. या प्रकरणी कोणालाही माफ करू नका, अशी मागणी लेकीने केली आहे. पनवेल सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार आहे.