चाकरमान्यांसाठी एसटी सज्ज

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

गणेशोत्सवासाठी कोकणाकडे रवाना होणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सज्ज झाली आहे. चाकरमान्यांना त्यांच्या गावाकडे पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर एसटी बस व इतर वाहने तैनात करण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातून आलेले वाहनचालकही चाकरमान्यांना कोकणात घेऊन जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्र्श्वभूमीवर पनवेल परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. बाप्पाच्या आगमनासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Exit mobile version