। उरण । वार्ताहर ।
आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्या स्तरामध्ये स्पर्धेची रस्सीखेच चालू असून, सन 2023-24 मध्ये झालेल्या ओलिंपियाड परिक्षेत भारतातील 25 राज्यातील 750 शाळांनी भाग घेतला होता.
त्या परीक्षेत लाखो विद्यार्थी आपले नशीब आजमावत होते. त्यातूनच उरण तालुक्यातील सेंट मेरीज शाळेतील आराध्य मयुरेश पाटील या इयत्ता तिसरीमधील प्रतिभाशाली विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर रिझनींग विषयात प्रथम स्थान प्राप्त केले आहे. त्यानिमित्त त्याला सेंट मेरीज शाळेचे मॅनेजर फादर मार्शल लोपेझ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेकडून प्रशस्तीपत्रक, ट्रॉफी व सुवर्णपदक सेंट मेरीज शाळेच्या प्रिन्सिपल सिस्टर मेरी कोनिकरा, सेकंडरीच्या सुपरवायझर संगीता पाटील व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रिबेका डिसोझा व शिक्षकांनी सन्मानपूर्वक देऊन सत्कार केले. त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.







