22 मार्चला होणार एसटी विलीनीकरणावरील सुनावणी !

। मुंबई । वृत्तसंस्था ।
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासंदर्भातील बैठका आणि संप होऊनसुद्धा काहीच तोडगा निघाला नाही. विलीनीकरणासंदर्भात शुक्रवारी हायकोर्टात युक्तिवाद पार पडला. या विषयावरील पुढील सुनावणी ही 22 मार्च रोजी होणार आहे. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनकरण शक्य नसल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली होती. त्यात पुन्हा एकदा सुनावणीसाठी नवी तारीख देण्यात आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा कायम आहे.

Exit mobile version