एसटी संपाला मनसेचा पाठिंबा

श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन आगारातील संपात सहभागी झालेल्या एस.टी.कर्मचार्‍यांना आता तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शविला आहे.पदाधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांची भेट घेत मनसे संघटना एस.टी.कर्मचार्‍यांच्या पाठीशी कायम उभी असेल व कर्मचार्‍यांच्या बंदच्या लढ्यात सोबत असेल,अशी ग्वाही दिली.यावेळी तालुकाध्यक्ष सुशांत पाटिल, सचिव सुमित सावंत,संदेश कातळकर,रोहन आडमकर,प्रसाद बांद्रे उपस्थित होते.

Exit mobile version