एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा- प्रा. राजेश ढवळे

देशातल सहकारक्षेत्र टिकलं पाहिजे शेकापची भूमिका -भाई मोहन गुंड

धारुर | प्रतिनिधी |

चार ऑक्टोबर पासून कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या यासह अनेक मागणीसाठी राज्यभर संप पुकारलेला आहे, सदरील कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असून शेतकरी कामगार पक्षाचा या आंदोलनाला जाहीर पाठिंबा असल्याचं पत्र शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा राजेश ढवळे,भाई मोहन गुंड धारुर शेकापचे युवा भाई अमोल सावंत भाई निलेश थिटे यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे.
या वेळी प्रा भाई ढवळे सरांनी निष्क्रिय सरकारवर टीका केली कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला, तर सहकार क्षेत्र टिकले पाहिजे सहकार हे सर्वांचा असतं खाजगी म्हणजे एकाची मक्तेदारी असते भांडवल शाहीच्या दिशेने चाललेला देश आता वाचवण्याची गरज आहे सहकाराच्या बाजूने नेहमी शेतकरी कामगार पक्ष उभा राहिलेला आहे आणि आंदोलकांच्या पाठीशी मागण्या मान्य होई पर्यंत शेतकरी कामगार पक्ष आपल्या सोबत आहे अशा भावना भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केल्या,धारुर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली सदर मागण्यांचा तात्काळ विचार नाही झालेल्या शेतकरी कामगार पक्ष एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे भाई शिवराम बोबडे ,रेवण नखाते रोहित गायकवाड, सुमित पोटभरे ,गणेश थोरात ,बलभीम मुंडे, रशीद शेख,आकाश मस्के यांनी आगार प्रमुख धारुर तहसिलदार यांना दिले आहे.

Exit mobile version