| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील मोठे भोम येथील श्री हनुमान नाट्य मंडळाच्यावतीने ‘सिंह गर्जला रणी’ या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचे सादरीकरण शनिवारी (दि.4) करण्यात येणार आहे. गुरुवर्य वसंतदादा चिर्लेकर हे या नाट्यप्रयोगाचे प्रेरणास्थान आहेत. तर, नाटकाची निर्मिती व व्यवस्थापन ग्रामस्थ मंडळ मोठेभोम यांची असून, सहनिर्मिती घनश्याम पाटील, समीर नारंगीकर, किशोर केणी, नवनीत नारंगीकर, दिलीप पाटील, बबन पाटील, सचिन घबाडी, भारती सुनील पाटील, श्याम नामदेव पाटील, अनिल जोशी यांची आहे. नाटकाचे लेखन मदन राजवाडेकर यांचे आहे. तर, दिग्दर्शन विजय केणी यांचे असून, सहदिग्दर्शन सुनील पाटील, चंद्रशेखर पाटील यांचे आहे. सूत्रधार रोहण पाटील असून, मोठेभोम प्राथमिक शाळेसह साहिल केणी, राजेश पाटील, शरद केणी, निलेश ठाकूर, दत्तात्रेय म्हात्रे यांचे नाट्यप्रयोगास विशेष सहकार्य लाभले आहे. निर्मिती साह्य सदानंद पाटील यांचे आहे. तसेच, या नाटकात बबन पाटील, अनंत पाटील, संग्राम ठाकूर, विजय केणी, चंद्रशेखर पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अभिजीत पाटील, अशितोष ठाकूर, सर्वेश पाटील, निलेश पाटील, अर्चना पाटील, श्रावणी म्हात्रे, राजेश पाटील, रितेश पाटील, साई ठाकूर, उदय पाटील, अतुल पाटील, संगम नारंगीकर, साई पाटील, कमलाकर पाटील, विवेक पाटील, साहिल केणी, दवेश नारंगीकर आदी कसलेले कलाकार आपल्या अभिनयाचे रंग उधळणार आहेत.





