गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या पदावरून पायउतार होणार आहेत. यानंतर भारतीय संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल, ज्याची घोषणा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. हा नवा मुख्य प्रशिक्षक दुसरा कोणी नसून माजी सलामीवीर गौतम गंभीर आहे.

रिपोर्टनुसार, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या नावाला मंजुरी देण्यात आली असून बीसीसीआय आणि गंभीर यांच्यात करारही झाला आहे. टी-20 विश्‍वचषकानंतर गंभीरच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, बोर्ड आणि गंभीर यांच्यात चर्चा झाली आहे. तो राहुल द्रविडची जागा घेणार आहे. तसेच, गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेताच केवळ सपोर्ट स्टाफमध्येच नाही, तर संघातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल राहुल द्रविडपेक्षा वेगळी आहे. द्रविड हा संयमी आहे. मात्र, गंभीर हा आक्रमक क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देतो.

Exit mobile version